मराठा आंदोलनाला हिंसक वळण, १० गाड्या फोडल्या


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- आरक्षण मिळावे या मागणीसाठी काल गंगाखेडच्या बंदला हिंसक वळण लागले. आंदोलनकर्त्यांनी ४ ट्रॅव्हल, ६ बसवर दगडफेक करून बसचा चक्काचुर केला, तर एक बस पेटवून दिली. घटनेचे वार्तांकंन करणार्‍या दोन पत्रकारासह लहान मुलास आदोंलनकर्त्यांनी जबर मारहाण केली. तर राष्ट्रवादीचे आमदार डॉ. मधुसूदन केंद्रे याचा कार्यालयावर आणि पोलिसांच्या जीपवर दगडफेक करण्यात आली. 

Loading...
शहारात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस प्रशासनास आंदोलन हताळता न आल्याने शहरात तणाव निर्माण झाला आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याचा मागणीसाठी परळी येथे पाच दिवसापासून ठिय्या आंदोलन सुरू असून आंदोलकांनी श्री विठ्ठलाच्या शासकीय पूजेपासून मुख्यमंत्र्यांना रोखले. आरक्षणच्या नावाखाली मराठा समाजाची फसवणूक होत आसल्याचा संताप मराठा समाजात तीव्र होत होता. 

परळी येथे पाच दिवसापासून सुरू आसलेल्या ठिय्या आंदोलनास पांठिबा देण्यासाठी मराठा समाजाने गंगाखेड बंदची हाक दिली होती. सकाळी १० वाजता सकळ मराठा समाज शहरातील श्रीराम चौकात जमा होवून शांततेत आरक्षण मिळालेच पाहिजे अशा घोषणा देत महाराणा प्रताप चौकात रस्ता रोकोसाठी ठिय्या देऊन आंदोलन करीत परळी येथून गंगाखेड येणार्‍या ६ बसेसच्या संपूर्ण काचा फोडण्यात आल्या. 

बस मधील प्रवासी भयभीत झाले होते. पुणे येथून नांदेडकडे जाणार्‍या ४ ट्रॅव्हल बस विशाल पेट्रोलपंप परिसरामध्ये थांबविण्यात आल्या असता आंदोलनकर्त्यांनी या बसेसच्या संपूर्ण काचा फोडल्या. परभणी येथून लातूरकडे जाणारी बस पेटवून दिल्याने बस जळून खाक झाली. तसेच रुमणापाटी येथे नागपुर-परळी बसच्या काचा फोडण्यात आल्या. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.