मुख्यमंत्र्यांनी केली 'मराठा क्रांती मोर्चा'ची बदनामी.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- "मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 2016 पासून मराठा समाजाचे 58 'क्रांती मोर्चे' झाले. हे सर्व मोर्चे शांततेचे प्रतिक होते. या मोर्चांमधून अडीच कोटी लोक रस्त्यावर आले. मात्र यामध्ये एकही हिंसक घटना घडली नाही. याची जगाने नोंद घेतली. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठा क्रांती मूक मोर्चांमधील कार्यकर्त्यांची बदनामी करत आहेत,'' असा आरोप संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड यांनी सोमवारी केला.


Loading...
तसेच मुख्यमंत्र्यांनी संबंध मराठा समाजाला घातपाती ठरवत तुम्ही शिवाजी महाराज यांचे मावळे नाहीत अशी जाहीर भूमिका घेतली आहे. त्यांनी मराठा समाजाची बदनामी केल्याबद्दल जाहीर माफी मागावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली. 

गायकवाड म्हणाले, पंढरपूर येथे मराठा समाजाकडून गर्दीत साप सोडणे, चेंगराचेंगरी करणे आणि हिंसा केली जाणार आहे. अशी गोपनीय अहवालात माहिती मिळाली असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. मात्र त्यावर कारवाई करण्याऐवजी ही माहिती सार्वजनिक करण्याची गरज काय होती. असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.