कॅनडाच्या साईभक्ताच्या मर्सिडीजमधून चोरी चार लाख रुपयांसह मोबाईल लंपास


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- साईबाबांच्या दर्शनासाठी आलेल्या कॅनडा येथील अनिवासी भारतीय साईभक्ताच्या मर्सिडीज कारचे दरवाजे खोलून ४ लाखाच्या रोख रकमेसह २० हजार रुपये किंमतीचा मोबाईल चोरून नेल्याची घटना रविवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली. 

Loading...
शिर्डी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा नोंदविला आहे.. याबाबत अधिक माहिती अशी की : कॅनडा येथील अनिवासीय भारतीय व्ही.कृष्णमुर्ती आणि त्यांची पत्नी अनुराधा कृष्णमुर्ती हे रविवार दि. ८ जुलै रोजी सकाळी माध्यान्ह आरतीपूर्वी साई समाधीचे दर्शन घेण्यासाठी मुंबईवरून मर्सिडीज कारमध्ये आले होते. 

सकाळी १० वाजेच्या सुमारास मर्सिडीज कार (नं. डी.एन.०९ के.ए.२१२१) नगर-मनमाड महामार्गावर साईबाबा मंदिराच्या गेट नं. ५ समोर पार्क करून चालकासह दर्शनासाठी गेले असता या दरम्यान अज्ञात चोरट्याने गाडीचे दरवाजे खोलून गाडीतील बॅगेत ठेवेलेले ४ लाख रुपये,त्याचप्रमाणे २० हजार रुपये किमतीचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल व पासपोर्ट, व्हिसा, ए.टी.एम.कार्ड असा मुद्देमाल चोरीला गेल्याची फिर्याद संदीप विजय परब (वय.३० रा. डोंबिवली ठाणे) यांनी शिर्डी पोलिसात दिली. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.