रस्त्यावरील खड्डयांची पूज़ा करून गांधीगिरी.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- सार्वजनिक बांधकाम विभाग रस्त्यावरील खड्डे बुज़वत नसल्याच्या निषेधार्थ टाकळी ढोकेश्वर येथील नागरिकांनी रस्त्यावरील खडड्डयांची पूज़ा करून गांधीगिरी आंदोलन केले. पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर गावातून जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे हा रस्ता वाहतुकीसाठी अंत्यत धोकादायक झाला आहे. 

रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ता, हे वाहनचालकांना कळेनासे झाले आहे. यापूर्वी या रस्त्यावर अनेक अपघात होऊन दुचाकीस्वार जखमी झाल्याचे घटना घडल्या आहेत. याबात निवेदन देऊनही सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदारी झटकत आहे. हा रस्ता पंचक्रोशीतील गांवासाठीचा अत्यंत रहदारीचा रस्ता आहे. 

Loading...

पाऊस पडल्यावर पाणी साचून खड्ड्याचा अंदाज न आल्यामुळे भविष्यात अपघात होण्याची संभावना लक्षात घेऊन वांसुदा चौकापासून गावापर्यंत रस्त्याचे काम व्हावे, अशी मागणी या वेळी सर्व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली. 


या आंदोलनात बाळासाहेब खिलारी गुरुजी, अमोल साळवे, योगेश शिंदे, बापू शिर्के, दत्ता निवडुंगे, गणेश गायकवाड, सागर हांडे, अमित गांधी, संकेत थोपटे, बिंदकुमार नरड, तुषार केदार सहभागी झाले होते. रस्त्याचे काम लवकरात लवकरच लवकर न झाल्यास सार्वजनिक बाधकाम विभागाच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा या वेळी पंचायत समिती सदस्या सौ. सुप्रिया साळवे यांनी दिला आहे.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.