मार्तंड पतसंस्थेत 1 कोटी 90 लाखांचा अपहार.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नगर येथील गुजरगल्लीतील मार्तंड नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये 1 कोटी 83 लाख 32 हजार 782 रुपयाची अफरातफर करून अपहार केल्याप्रकरणी कोतवाली पोलीसांनी पतसंस्थेचे उपाध्यक्ष विनायक नन्नवरे यांच्यासह चार जणांना अटक केली असून त्यांना 9 जुलैपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. 

Loading...
गुजरगल्ली येथील गुरुदत्त सहवास अपार्टमेंट मधील मार्तंड पतसंस्थेचे कार्यालय असून या पतसंस्थेत 1 एप्रिल 2010 ते 31 मार्च 2015 या पाच वर्षांत पतसंस्थेचे अध्यक्ष, व्यवस्थापक व संचालक मंडळाने संगमनत करून सभासद व ठेवीदरांच्या 1 कोटी 83 लाख 32 हजार 782 रुपयांची अफरातफर करून अपहार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. 

सभासद व ठेवीदारांची विचारपुस केली असता पतसंस्थेत अपहार झाल्याचे निष्पन्न झाल्याने पोलीसांनी उपाध्यक्ष विनायक पांडूरंग नन्नवरे, हेमंत दासू घोडे, संदीप दिलीप काटे व वैभव पद्माकर मुसळे या चौघांना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने 9 जुलैपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.