पावसाने पाठ फिरवल्याने चिंता वाढली,शेतक-यांवर दुबार पेरणीचे संकट.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- पावसाने पाठ फिरवल्याने राहाता तालुक्‍यातील शेतकऱ्यांवर खरिपाच्या पिकांसाठी दुबार पेरणीचे संकट ओढवल्याने येथील शेतकरी चिंताग्रस्त झाला असून आभाळाकडे आस लावून बसला आहे. दरम्यान जून महिन्याच्या उत्तरार्धात तालुक्‍यात वरून राज्याने थैमान घालत पाणीच पाणी करून टाकले होते. 

तालुक्‍यात सर्वत्र पडलेल्या पावसामुळे सोयाबीन पिकांच्या पेरणीला वेग घेतला होता. बहुतांशी शेतकऱ्यांनी खाजगी बियाणे घेऊन मोठ्या प्रमाणावर सोयाबीनची पेरणी केली होती. मात्र मागील आठवड्यापासून पावसाने दडी मारल्याने काही ठिकाणी आलेली पिके सुकायला लागली आहे.त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळले आहे. 

दरम्यान तालुक्‍यात कपाशी ऐवजी सोयाबीन लागवडीसाठी शेतकऱ्यांनी आपली पसंती दर्शविल्याने सोयाबीन बियाणांचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा निर्माण झाला होता. त्यावर मात करीत शेतकऱ्यांनी जास्त भावाने बियाणे खरेदी केले. तालुक्‍यात 38 हजार 400 हेक्‍टर क्षेत्र खरिपाच्या लागवडी खाली येणार असल्याची माहिती कृषी विभागाने दिली होती. पैकी तालुक्‍यात 80 टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहे. 

Loading...
पुणतांबा आणि वाकडी येथे सोयाबीन बियाणांचा तुटवडा आला होता मात्र तीन दिवसापूर्वी तेथील दुकानदारांनी 300 क्विंटलची मागणी केली होती त्यानुसार त्याच दिवशी पुणतांबा व वाकडी येथे 30 क्विंटल बियाणे पोहाच करण्यात आले होते.

त्यामुळे या भागात पन्नास टक्के पेरण्या झाल्या असल्याचे तालुका कृषी अधिकारी गायकवाड यांनी सांगितले. चालूवर्षी बोंड अळीच्या प्रादुर्भावाने शेतकऱ्यांनी कपाशीकडे पाठ फिरवली असून पंधरा टक्केच लागवड करण्यात आली आहे.

अगोदरच कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने खरेदी केलेल्या हरभऱ्याचे पैसे मिळाले नाहीत. दरम्यान कृषी अधिकारी गायकवाड यांनी सांगितले कि खरीप हंगामाचे मका आणि बाजरी, त्यानंतर रब्बी हंगामचे हरभराचे बिले शेतकऱ्यांकडून घेतले असून तालुका स्तरावरील बाजरी मका आणि हरभरा यांचे पैसे गटांच्या नावावर आर.टी.जी.एस.केले आहे. 

नगरचे पैसे दोन तीन दिवसात मिळणार असल्याचे सांगितले. दुबार पेरणी करायची तर पैशाअभावी बियाणे मिळत नाहीत. त्यामुळे यंदा पिक कसे घ्यायचे या विवंचनेत बळीराजा सापडला असून येथील शेतकरी चिंताग्रस्त असल्याचे दिसून आले आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.