आमदार जगताप पित्रापुत्रांचे शहरात संयमी स्वागत.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- केडगाव दुहेरी हत्याकांड प्रकरणातील आरोपपत्रातून आमदार अरुण जगताप व आ. संग्राम जगताप यांची नावे वगळल्याने न्यायालयाने त्यांना रीतसर जामीन दिला. औरंगाबाद येथील कारागृहातून सर्व कायदेशीर प्रक्रियानंतर शनिवारी सायंकाळी आ. संग्राम जगताप यांची कारागृहातून सुटका झाली. 

त्या वेळी मोठ्या संख्येने नगरहून कार्यकर्ते औरंगाबाद येथे गेले होते. कारागृहातून सुटका झाल्यानंतर आ.जगताप यांनी खुलताबाद येथील भद्रा मारुतीचे दर्शन घेतले तसेच शनीशिंगाणापूरमधील शनींचे दर्शन घेऊन रात्री उशिरा नगरला आले. Loading...
आ. जगताप यांचे रस्त्यात ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. ते तीन महिने घराबाहेर असूनही शहरात येताच स्वगृही जाणार असा अनेकांचा अंदाज होता; मात्र शहरात येताच ते थेट कै. कैलासमामा गिरवले यांच्या घरी गेले. तेथे त्यांनी गिरवले कुटुंबीयांची भेट घेतली.

गिरवले यांच्या पत्नी, मुलगा व भावाची भेट घेऊन त्यांनी सांत्वन केले. गिरवले यांच्या फोटोस अभिवादन केल्यानंतरच ते घरी आले. घरी आल्यानंतर आई व पत्नी यांनी औक्षण केले. त्या वेळी हजारोच्या संख्येने कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. 


कार्यकर्त्यांमध्ये उत्साह होता; मात्र कोणीही घोषणा दिल्या नाहीत तसेच हारतुऱ्यांनी स्वागतही कोणी केले नाही. संयमाने आ.अरुण जगताप व संग्राम जगताप यांचे स्वागत झाले. तीन महिन्याच्या दीर्घ काळानंतर आपले नेते भेटल्याने कार्यकर्त्यांमध्ये मोठा आनंद व उत्साह होता. 


आ. संग्राम जगताप सर्वांच्या भेटी घेत हस्तांदोलन करत होते. आ. जगताप यांना पाहताच सगळे कुटुंब भावूक झाले. सारसनगरमधील घराजवळही रात्री राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठी केली होती; मात्र सर्वांनी शांततेत अरुण जगताप व संग्राम जगताप या आमदार यांचे स्वागत केले.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.