श्रीगोंद्यात कैद्याचा गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- श्रीगोंदे येथील दुय्यम कारागृहात दरोड्याच्या गुन्ह्यात न्यायालयात कोठडीत असलेला शाहरूख आरकस काळे (वय २१, रांजणगाव, ता. पारनेर) याने दोरीने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. बुधवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास चार क्रमांकाच्या कोठडीत हा प्रकार झाला. शाहरूखला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मला जामीन मिळणार नाही, जेलमधून बाहेर पडता येणार नाही, माझ्या जगण्यात काही अर्थ नाही, मला जीवन नकोसे झाल्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, असे त्याने सांगितले. 

या घटनेबाबत कॉन्स्टेबल रमाकांत परिट यांनी फिर्याद दिली आहे. दोन-तीन वर्षांपूर्वी हिरडगाव व कोकणगाव शिवारातील दरोड्याच्या गुन्ह्यात पोलिसांनी शाहरूख व त्याच्या साथीदारांना अटक केल्यापासून तो कारागृहात आहे. बुधवारी मध्यरात्री शाहरूखने अंगातील बनियनपासून दोरी तयार केली. 

Loading...

गजाच्या वरील बाजूस दोरी अडकवून त्याने गळफास घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, इतर आरोपींनी आरडाओरडा करताच पोलिस धावले. पोलिस नाईक पठाडे व जगताप यांनी शाहरूखला इतर आरोपींच्या मदतीने खाली उतरवले. याप्रकरणी काळे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.