निकृष्ट शीतकपाटे देणाऱ्या संस्थेकडूनच ५३१ कोटींची औषध खरेदी!.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने जनावरांसाठी ५३१ कोटींची औषधे खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र काही वर्षांपूर्वीच याच कंपनीने पुरवलेली शीतकपाटे अत्यंत निकृष्ट दर्जाची असल्याच्या प्रकाराकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले आहे.तसेच आजपर्यंत या कंपनीकडून सुमारे २ कोटींची औषधेही जिल्हा परिषदेने घेतली आहेत.त्यामुळे या औषध खरेदीची चौकशी करण्याची मागणी जिल्हा परिषदेचे भाजपा गटनेते जालिंदर वाकचौरे यांनी विभागीय आयुक्तांकडे केली आहे.

या खरेदी केलेल्या औषधांचा दर्जा अत्यंत सुमार आहे.त्यामुळे या औषध खरेदीची चौकशी करावी. अशी मागणी जिल्हा परिषदेचे भाजपा गटनेते जालिंदर वाकचौरे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी नाशिक विभागीय आयुक्त राजाराम माने यांची भेट घेवून त्यांना याबाबत निवेदन देवून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. 
Loading...

याबाबत वाकचौरे म्हणाले, राज्य सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेत आहे.दुग्ध व्यवसाय वाढीसाठी सरकार अनुदानासह विविध योजना राबवत आहे. जिल्हा परिषदेने मात्र या व्यवसायासाठी महत्वाच्या असलेल्या जनावरांसाठी निकृष्ट दर्जाची औषधे खरेदी करणार आहे.

याबाबत तसा आदेश देखील काढला आहे. मागील काही दिवसांपूर्वी औारंगाबाद येथील एका खासगी संस्थेकडून निकृष्ट दजाृची शीतकपाटे खरेदी केली होती. परत त्याच संस्थेकडून तब्बल ५३१ कोटींची औषधे खरेदी केली जाणार आहेत. 

यापैकी २ कोटींची औषधे देखील खरेदी केली आहेत.. याबाबत मागील सहा महिन्यांपूर्वीच जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनीताई विखे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वसाधारण सभेत शीत कपाटाबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता.

तसेच या संस्थेला काळ्या यादीत टाकण्याची मागणीही केली होती. त्यावर मात्र जिल्हा परिषदेने ही शीतकपाटे राज्य सरकारने खरेदी केल्याचे सांगितले होते.

परंतु ती शीतकपाटेही जिल्हा परिषदेनेच खरेदी केल्याचे नंतर स्पष्ट झाले होते. जिल्हा परिषद जी औषधे या कंपनीकडून खरेदी करणार आहे. ती औषधे बाजारात देखील मिळत नाहीत. हीच औषधे जर परत बाजारात विकल्यास ती कुणीच घेणार नाही.

अशा अत्यंत निकृष्ट दर्जाची ही औषधे असतानाही जिल्हा परिषदेने जनावरांसाठी तब्बल ५३१ कोटींची औषध खरेदी करण्याचा घाट घातला आहे.तरी या सुमार दर्जाच्या औषध खरेदीची चौकशी करावी. अशी मागणी वाकचौरे यांनी केली आहे. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.