नीलेश लंके व महादेव जानकर यांच्या भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- पारनेर तालुक्यातील राजकीय वर्तुळात सध्या चर्चेत असलेले शिवसनेचे पारनेर तालुकाप्रमुख नीलेश लंके यांच्या सुपा येथील संपर्क कार्यालयाला राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक व पशुसंवर्धन, दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांनी सदिच्छा भेट दिल्याने याची तालुक्यात चांगलीच चर्चा सुरू आहे. 
Loading...

या वेळी लंके यांनी जानकर यांचा सत्कार केला. या वेळी लंके म्हणाले, दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला भाव वाढून मिळावा, यासाठी माझा पाठपुरावा सुरू असून, सुपा औद्योगिक वसाहतीमध्ये शेतीपुरक उद्योग वाढविण्याबाबत तसेच जिल्हा दौऱ्यावर असलेल्या मंर्त्यांबरोबर शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा दूध दरवाढ या विषयावर सखोल चर्चा करून दूध उत्पादकांच्या समस्या व आर्थिक स्थितीबाबत माहिती दिली. जानकर यांनी लंके यांच्या समाजकार्याचे कौतुक केले.

दूध उत्पादकांबाबत सकारात्मक दृष्टीने निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी लंके प्रतिष्ठानचे अध्यक्ष बापू शिर्के, सचिव पोटघन मेजर, सरपंच राजेंद्र शिंदे, अनिल गंधाक्ते, वाघुंडे सरपंच संदीप मगर, संदीप सालके, दौलत गांगड, सचिन पवार, सुखदेव चितळकर, परशुराम सोंडकर आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, लंके व ज़ानकर यांच्या या भेटीमुळे तालुक्यातील राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरू आहे.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.