स्वत:ला अभ्यासू, सुसंस्कृत आणि कार्यसम्राट समजणाऱ्या लोकप्रतिनिधींकडून जनतेचा अपमान.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- स्वत:ला अभ्यासू, सुसंस्कृत आणि कार्यसम्राट समजणाऱ्या लोकप्रतिनिधींकडून पारनेर तालुक्यातील जनतेचा १४ वर्षे व नगर तालुक्यातील जनतेचा ९ वर्षे फक्त अपमान करत सुसंस्कृतपणा दाखवून दिला. तोंड पाहून लोकांच्या सुख-दु:खात सहभागी झाले. 

माझ्यासह नगर तालुक्यातील जनतेचा आणि अनेक कार्यकर्त्यांचा वेळेपुरताच वापर केला. त्यांनी कसे राजकारण केले. कोणाला कसे संपवले, कोणती कामे कशी अडवली हे मला खडानखडा माहीत आहे. योग्य वेळी आमदार औटी यांचे पत्ते उघडे केले जातील, असे नीलेश लंके प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तथा शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख नीलेश लंके यांनी व्यक्त केला. नगर तालुक्यातील विळद येथे नीलेश लंके प्रतिष्ठानच्या शाखेचे उद्घाटन लंके प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष नीलेश लंके यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. 

या वेळी लंके म्हणाले, तीन पंचवार्षिकला मी नगर-पारनेरच्या लोकप्रतिनिधीच्या मागे उभा राहिलो. नगरची, पारनेरची जनता मिळणाऱ्या अपमानास्पद वागणुकीबाबत माझ्याशी उघडपणे बोलायची. मी लोकांची समजूत काढायचो म्हणून त्यांना विधानसभेत जाता आले. मी सदैव लोकांच्या सुख-दु:खात सहभागी होत असल्याने माझ्या मागे सर्वसामान्य जनता उभी आहे. 

आपल्याला स्पर्धक होणार या भीतीने आता माझ्याविषयी आणि मला साथ देणाऱ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांविषयी टुकार, भंगार असे अपशब्द वापरले जात आहे. हीच जनता आता तुम्हाला तुमची जागा दाखवेल. सकिती वेळा या भागातील के. के. रेंजच्या प्रश्नाबाबत वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा केला ते यांनी सांगावे. 


Loading...
नगरमधील एमआयडीसीमधील कंपन्या बाहेर जात आहेत. त्यामुळे या भागातील युवकांच्या हाताचा रोजगार कमी होत आहेत. त्यासाठी आपण किती प्रयत्न केले ते तरी सांगा. मतदारसंघातील बहुतांशी जनता शेती करते, आज धान्याचे, दुधाचे बाजारभाव शेतकऱ्यांना न परवडणारे आहेत. याबाबत आपण आजवर मूग गिळून गप्प का आहात. असे अनेक प्रश्न लंके यांनी आमदार औटी यांना केले.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.