बिबट्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- बिबट्याच्या दहशतीने खंडाळा-उक्कलगाव रस्त्यालगतचे पशुपालक व शेतकरी धास्तावले असून या भागात वनविभागाने त्वरित पिंजरा लावावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.. श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा-उक्कलगाव दरम्यान डेंगळे, राहाणे या शेतकऱ्यांच्या वस्त्या आहेत. 


Loading...
नेहरूवाडी परिसर सोडल्यानंतर पुढे निर्जन परिसर आहे. त्यामुळे रात्री-अपरात्री एकटा माणूस दुचाकीवरसुध्दा प्रवास करू शकत नाही. राहाणे वस्ती व डेंगळे वस्ती येथील पाळीव कुत्रे बिबट्याने फस्त केले. विजय साखरे यांचेही कुत्रे दोन दिवसापूर्वी बिबट्याची शिकार झाले. नाना राहाणे व मुरलीधर राहाणे यांनी रस्ता ओलांडताना बिबट्याला पाहिले. गौरव डेंगळे यांच्या उसात सध्या बिबट्याचे वास्तव्य आहे. वनविभागाने त्वरित पिंजरा लावावा, अशी मागणी डेंगळे यांनी केली आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.