अश्लील संभाषण करणाऱ्या सरपंच पतीच्या अटकेसाठी महिला कर्मचाऱ्यांची निदर्शने

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नगर तालुक्यातील एका गावातील महिला सरकारी कर्मचाऱ्यासोबत फोनवरून अश्लील संभाषण करणाऱ्या सरपंच पतीसह इतर आरोपींना त्वरित अटक करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते व गटप्रवर्तक संघटना, तसेच जिल्हा संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. 

या वेळी अॅड. सुधीर टोकेकर, कॉ. अंबादास दौंड, सुवर्णा थोरात, संतीश पवार, कोमल कासार, अरुणा आगरकर, वैशाली गायकवाड, सुनंदा भोसले, मंगल नांगरे, निर्मला खोडदे, रुपाली बनसोडे, मीना कदम, रुपाली चौधरी, वैशाली वाघुले, शारदा काळे, मनीषा कुलट आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. 
Loading...

पीडित महिलेने संभाषण करणाऱ्या वक्तीसह इतरांवर गुन्हा दाखल केलेला आहे. आराेपीने पीडित महिलेस फोन करून अश्लील भाषा वापरून शरीर सुखाची मागणी केली. या संभाषणाची रेकॉर्डिंग संबंधित आरोपीने व्हायरल करून, महिलेची बदनामीही केली. तर पीडित महिलेच्या कुटुंबीयांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हाही दाखल केला. ग्रामस्थ देखील महिला कर्मचारीच्या पाठीशी असल्याचे निवेदनात म्हटले आहे. 

महिला कर्मचारीच्या कुटुंबीयांवर दाखल केलेला अॅट्रॉसिटीचा गुन्हा मागे घ्यावा, अारोपीला तातडीने अटक करण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे; अन्यथा जिल्ह्यातील तीन हजार महिला कर्मचारी तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील यांना देण्यात आले. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.