शिर्डीत हॉटेलमध्ये तरूणीने घेतला गळफास


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- शिर्डी शहरात साई दर्शनासाठी आलेल्या अंकित किशोर खत्री व त्या बरोबर आलेली महिला सिमा लोकन चौधरी, वय-३२ या दोघांनी शिर्डीत नगर-मनमाड रोडच्या कडेला असलेल्या एका नामांकित हॉटेलमध्ये रुम घेतली होती.रुम घेतल्यानंतर तीच्या बरोबर असलेल्या अंकित किशोर खत्री रा. इंदोर,मध्येप्रदेश याने माझ्याबरोबर आलेली महिला सिमा लोकन चौधरी,वय- ३२ रा.भगिरातपुरा, इंदोर हिने स्कार्फच्या सहाय्याने फॅनला गळफास घेतल्याचे हॉटेलचे मालक दिनकर प्रल्हाद कोते यांना सांगितले. 

Loading...
तरुणीने आत्महत्या केल्याची माहिती मॅनेजर प्रविण नारायण तुरकणे यांनी शिर्डी पोलीसात दिली. त्या माहितवरुन शिर्डी पोलीसांनी अकस्मात मृत्यु रजिस्टर नंबर ७२/२०१९ सि.आर.पी.सी.१७४ प्रमाणे नोंद केली आहे. या घटनेने शिर्डीत मोठी खळबळ उडाली आहे. तसेच वर्षभरात परराज्यातील कधी महिला तर कधी पुरुष यांनी शिर्डीत येऊन आत्महत्या केल्याच्या घटना घडलेल्या आहेत. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.