सत्य परेशान हो सकता है, पराजित नही, तीन महिन्यानंतर आ.संग्राम जगताप कोठडी बाहेर !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- केडगाव हत्याकांडप्रकरणी गेल्या ३ महिन्यांपासून गजाअाड असलेल्या राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी शनिवारी सायंकाळी कारागृहाबाहेर पाय ठेवत मोकळा श्वास घेतला. 

या प्रकरणात त्यांच्यासह बाळासाहेब एकनाथ कोतकर यांना शनिवारी दुपारी न्यायालयाने प्रत्येकी १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यासह सशर्त जामीन मंजूर केला. हत्याकांड घडले त्याच दिवशी मध्यरात्री पोलिसांनी जगताप यांना अटक केली होती. तेव्हापासून ते कोठडीत होते. 

भद्रा मारुतीचे दर्शन,कार्यकर्त्यांची भेट  
आमदार जगताप हे शनिवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास हर्सुल कारागृहातून बाहेर आले. कार्यकर्त्यांची भेट घेतली. त्यानंतर ते येथे भ्रदा मारुतीच्या दर्शनासाठी गेलेे. ते रात्री नगरकडे रवाना झाले. नगरमध्ये आल्यानंतर ते स्व. कैलास गिरवले यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. 
Loading...

सत्य परेशान हो सकता है, पराजित नही!
केडगाव दुहेरी हत्याकांडातील दोषारोपपत्रात नाव नसल्याने आमदार संग्राम जगताप समर्थक शुक्रवारपासूनच सोशल मीडियावर आनंद व्यक्त करत होते. सत्य परेशान हो सकता है, पराजित नही, अखेर सत्याचा विजय अशा अनेक पोस्ट जगताप यांच्या फोटोसह सोशल मीडियावर फिरत होत्या. जामीन मंजूर झाल्यानंतर या पोस्टची संख्याही वाढली होती.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.