आ.संग्राम जगताप यांना जामीन मंजूर.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- केडगाव हत्याकांड प्रकरणी संशयित म्हणून गेल्या तीन महिन्यापासून कोठडीत असलेले आ.संग्राम जगताप यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.प्रत्येकी १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर आ.संग्राम जगताप व नगरसेवक विशाल कोतकर यांचे वडील बाळासाहेब कोतकर यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.
Loading...
दोषारोपपत्रात नाव नसल्याने राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांना जिल्हा न्यायालयाने जामीन मंजूर केला. आज आ.जगताप यांच्या वतीने अ‍ॅड. महेश तवले यांनी जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यानुसार १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.