स्वाती शर्मा मिसेस इंडिया युनिवर्स पुरस्काराने सन्मानित


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नगर मधील स्वाती प्रवीण शर्मा - तांदळे यांना मिसेस इंडिया युनिवर्स 2018 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.दिल्ली येथे झालेल्या देशातील सर्वांत प्रतिष्टेचा समजल्या जाणाऱ्या ब्युटी पेजंट दिवालीसियस मिसेस इंडिया युनिवर्स 2018 तसेच बॉडी ब्युटीफुलचा पुरस्कार स्वाती शर्मा यांना मिळाला. 


Loading...
देशातील 30 स्पर्धकांमधून स्वाती प्रवीण शर्मा - तांदळे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
स्वाती या उद्योगपती प्रवीण शर्मा यांच्या पत्नी असून नगर येथील माजी कृषी आधिक्षक अर्जुन तांदळे यांच्या त्या सुकन्या आहेत. 

या स्पर्धेत कौंटुंबिक जबाबदारी सांभाळत आपली आवड जपणार्‍या स्वाती शर्मा यांनी या स्पर्धेच्या चमचमत्या मुकुटावर आपले नाव कोरले आहे.माणसाला आत्मविश्वासाच्या जोरावर आणि स्वकतृत्वाच्या बळावर कितीही मोठी उंची गाठता येते हे शर्मा यांच्या यशावरून शिकण्यासारखे आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.