सापडलेले लाखभराचे दागिने केले परत !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नगर येथील क्रिस्टल कंपनीच्या सफाईकामात त्रिशिला नितीन शिंदे या महिलेला लाखभर किमतीचे दागिने सापडले. तिने प्रामाणिकपणे दागिने मूळ मालकाला परत केले. अधिकारी व कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी शिंदे यांचे कौतुक केले. 

२ जुलैला शिंदे माळीवाड्यात काम करत असताना कचऱ्याच्या कुंडीत त्यांना पिशवी दिसली. पिशवीत गंठण, ठुशी, अंगठी, बदाम व चांदीची कंबर साखळी, चांदीच्या पट्ट्या व एक मोबाइल असे सोन्या-चांदीचे दागिने होते. त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना ही माहिती दिली. त्यांनी एसटी आगाराच्या मुख्य अधिकाऱ्यांना कळवले. 

Loading...

वस्तू हरवलेल्या व्यक्तीने एसटी अधिकाऱ्यांशी संपर्क साधताच तारकपूरचे आगार व्यवस्थापक कलापुरे, स्थानकप्रमुख रोहित रोकडे, क्रिस्टलचे जिल्हाप्रमुख नीलेश आडोळे, कानिफनाथ दारकुंडे यांच्या उपस्थितीत दागिने मूळ मालकाला देण्यात आले.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.