उड्डाणपुलाच्या रॅम्पसाठी जागा अधिग्रहीत करा राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे मनपाला पत्र


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नगर शहरातील सक्कर चौक ते चांदणी चौक दरम्यान नियोजित उड्डाणपुलाच्या रॅम्पसाठी महानगरपालिकेने जागा अधिग्रहीत करण्याची कार्यवाही करावी असे पत्र राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने महानगरपालिकेला दिले आहे. नगर शहरातील सक्कर चौक ते स्टेट बॅंक चौक असा तीन किमी लांबीचा उड्डाणपूल मंजूर झालेला असून त्याचे अंदाजपत्रक २७९ कोटी रुपयांचे आहे. 

चारपदरी असलेल्या या उड्डाणपुलाचा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २२२ मध्ये समावेश करण्यात आलेला आहे. उड्डाणपुलासाठी या अगोदरच सक्कर चौक ते स्टेटबॅंक चौक या दरम्यानची जागा अधिगृहीत करण्यात आलेली आहे. मात्र सक्कर चौक व चांदणी चौकात करण्यात येणाऱ्या रॅम्पची जागा अजून अधिग्रहीत करण्यात आलेली नाही. 

Loading...

महानगरपालिका हद्दीत हा उड्डाणपूल असल्याने हि जागा अधिग्रहीत करण्याची महापालिकेची जबाबदारी आहे. या जागेचे भूसंपादन कधी करणार अशी विचारणा मनपाकडे करण्यात आली आहे. या संदर्भात महासभेची मंजूरी घ्यावी लागेल.


मनपा महासभेच्या मंजुरीनंतर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत हा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला जाणार आहे. त्यानंतर भूसंपादन प्रक्रिया राबविण्यात येईल. या भूसंपादन खर्चासाठी राज्य शासनाचा ७० टक्के तर मनपाचा ३० टक्के निधीचा वाटा असणार आहे. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.