महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे अंदाज चुकले.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :राहुरीतील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील हवामान विभागाकडून वर्तवण्यात येणारे पावसाचे अंदाज खोटे ठरले. 

गेल्या पंधरवाड्यातील अंदाजच शुक्रवारी पुन्हा जाहीर केले गेले. ७ ते १० जुलैदरम्यान कमाल तापमान २९ ते ३१ अंश सेल्सिअस, आकाश ढगाळ, वाऱ्याचा ताशी वेग १४ ते २२ किलोमीटर व तुरळक ठिकाणी पाऊस असा अंदाज बैठकीत वर्तवण्यात आला. 


Loading...
हरिश्चंद्रगडावर पाऊस मंदावल्याने कोतूळकडून मुळा धरणात येणारी पाण्याची आवक कमी झाली. शुक्रवारी सकाळी कोतूळकडून मुळा धरणात २२४७ क्युसेक, तर सायंकाळी ६ वाजता १५१३ क्युसेक पाण्याची आवक सुरू होती. 

गेल्या दोन दिवसांत धरणात ४०० दशलक्ष घनफूट पाणी दाखल झाले आहे. धरणातील पाणीसाठा ५ हजार १४१ दशलक्ष घनफूट झाला आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.