कोपरगावात दोन दिवसांत चार आत्महत्या


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  कोपरगाव शहरासह तालुक्यात दोन दिवसात वेगवेगळ्या कारणाने दोन तरूण व एक तरुणी अशा तीन जणांनी गळफास घेऊन तर एका विवाहित महिलेने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. हे सर्व १७ ते २७ वयोगटातील आहेत. या सर्व घटनांची पोलिसांत अकस्मात मृत्यु म्हणून नोंद आहे.

गुरूवारी, ५ जुलै रोजी संध्याकाळी ७ वाजेपूर्वी शहरातील संजयनगर भागात राहणाऱ्या अनिल गणेश कुऱ्हाडे (वय १९) या तरूणाने शहरातील लक्ष्मीनगर परिसरातील एका चिंचेच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. शहर पोलीस स्टेशनला या घटनेबाबत आकस्मात मृत्युची नोंद केल्यानंतर शवविच्छेदन करून शुक्रवारी सकाळी त्याचा अंत्यविधी करण्यात आला.

Loading...

शुक्रवारी,६ जुलै रोजी संजयनगर भागात राहणाऱ्या लक्ष्मी लखन आल्हाट या १७ वर्षे वयाच्या मुलीने दुपारी १२.३०च्या पूर्वी राहत्या घरातील पत्र्याच्या पाईपला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. तिचे नुकतेच लग्न ठरले होते. दि. ५ ऑगस्ट २०१८ ही लग्नाची तारीख काढली होती. 


याप्रकरणी शहर पोलिसात अकस्­मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. लक्ष्मी व अनिल हे दोघेही गरीब कुटूंबातील होते. त्यांचे आई-वडिल मोलमजुरी करणारे असल्याने या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे..

आत्महत्येची तिसरी घटना शहरातील शंकरनगर भागात घडली. गुरूवारी, ५ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजण्यापूर्वी पुजा पुंडलिक शिरसाठ (वय २७) या विवाहीतेने त्याच भागातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली आहे. मयत पुजा शिरसाठ हिच्या आत्महत्या करण्यामागचे कारण समजू शकले नाही. पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असुन पोलीस पुढील तपास करीत आहेत.

तालुक्यातील माहेगाव देशमुख येथील अनिल अर्जुन पवार (वय २४) या तरूणाने पायाच्­या आजाराला कंटाळुन ५ जुलै रोजी सकाळी झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. या घटनेची कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशला अकस्मात मृत्यची नोंद करण्यात आली आहे. 

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.