जिल्हा पोलिस दलातील १६ अधिकाऱ्यांच्या जिल्हांतर्गत बदल्या

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- जिल्हा पोलिस दलातील १६ अधिकाऱ्यांच्या जिल्हांतर्गत बदल्या करण्यात आल्याचे आदेश जिल्हा पोलिस अधिक्षक रंजनकुमार शर्मा यांनी गुरुवार दि. ५ जुलै रोजी आस्थापना मंडळाच्या बैठकीत दिले आहेत. या बदल्या प्रशासकीय कारणावरून, विनंतीवरून तसेच रिक्तपदामुळे करण्यात आल्या आहेत. 

Loading...


सपोनि मनोजकुमार राठोड (कोतवाली पोलिस ठाणे ते जामखेड पोलिस ठाणे), सपोनि दिलीप राठोड (राहुरी ते पाथर्डी), पोसई मोहन भोसले (श्रीरामपूर शहर ते राहुरी), पोसई सुनिल सुर्यवंशी (नेवासा ते एमआयडीसी), पोसई बाबुराव बोडखे (कोतवाली ते संगमनेर शहर), पोसई संजयकुमार सोने (तोफखाना ते सुपा), पोसई जयश्री काळे (भिंगार कॅम्प ते ट्रायल मॉनिटरिंग सेल, नगर), पोसई संजय मातोंडकर (पारनेर ते शेवगाव), पोसई राजेश मनतोडे (सुपा ते नियंत्रण कक्ष नगर), पोसई वैभव पेठकर (पाथर्डी ते तोफखाना), पोसई राजकुमार ससाणे (सोनई ते पाथर्डी), पोसई जगदीश मुलगीर (शिर्डी ते पारनेर), पोसई रामेश्वर तुरनर (कोपरगाव तालुका ते शिर्डी शहर वाहतूक शाखा), पोसई नितीन बेंद्रे (अकोला ते कोपरगाव शहर), पोसई बालाजी शेंगेपल्लू (अकोले ते शिर्डी), पोसई अशोक उजगरे (राजूर ते राहाता) या अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.