आ. जगताप यांना तुर्त दिलासा, पुरवणी दोषारोपपत्राची टांगती तलवार कायम.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- केडगाव येथील दोघा शिवसैनिकांच्या हत्याकांड प्रकरणी सीआयडीने शुक्रवारी (दि. ६) जिल्हा न्यायालयात आरोपी संदिप गुंजाळसह आठजणांविरुद्ध १३६६ पानी दोषारोपपत्र दाखल केले. 

तर राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप व बाळासाहेब एकनाथ कोतकर यांचेविरुद्ध सीआरपीसी १७३ (८) अन्वये अतिरिक्त पुरावा दाखल करण्याकामी तजवीज ठेवण्यात आली असून या गुन्ह्याचा तपास सुरू आहे. 


Loading...
केडगाव दुहेरी हत्याकांडाच्या दोषारोपपत्राकडे नगर जिल्ह्याच नव्हे तर संपूर्ण राज्याचेच लक्ष लागले होते. कोण सुटणार, कोण अडकणार याचीच उत्सुकता शिगेला पोहचली होती. शुक्रवारी दाखल केलेल्या दोषारोपपत्रात आ. जगताप यांना तुर्त दिलासा मिळाला असला तरी पुरवणी दोषारोपपत्राची टांगती तलवार कायम राहिली आहे.

केडगाव दुहेरी हत्याकांडातील अटकेत असलेल्या १० पैकी ८ जणांवर दोषारोपपत्र दाखल झाले. आ.संग्राम जगताप व बाळासाहेब कोतकर यांचा दोषरोपपत्रात समावेश नसला तरी त्यांच्यावर पुरवणी दोषारोपपत्राची टांगती तलवार कायम आहे. त्यासाठी सीआयडीने १७३ (८) कलमान्वयाचा आधार घेतला आहे. 

गुन्ह्यात एकूण ३० आरोपी आहेत. पैकी अटकेत असलेल्या १० पैकी ८ जणांविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. उर्वरित आरोपींविरुद्ध पुरावे मिळाल्यास सीआयडी आ. जगताप यांच्याविरुद्ध सीआरपीसी १७३ (८) कलमान्वये पुरवणी दोषारोपत्र दाखल होवू शकते म्हणूनच आ. जगताप यांच्यावर टांगती तलवार कायम आहे.

न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलेल्या आरोपींमध्ये भानुदास एकनाथ कोतकर, संदीप रायचंद गुंजाळ, नगरसेवक विशाल बाळासाहेब कोतकर, रवींद्र रमेश खोल्लम, बाबासाहेब विठ्ठल केदार, भानुदास महादेव कोतकर (बी. एम.), संदीप उर्फ जॉन्टी बाळासाहेब गिऱ्हे आणि महावीर उर्फ पप्पू रमेश मोकळे यांचा समावेश आहे. भादवी ३०२/३०३/१२० (ब) /१४३/१४४/१४५/१४७/१४८/१४९/५०४/५०६/३४ आर्म ॲक्ट ४/२५ अन्वये दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.