संगमनेर तालुक्यात ॲपेरिक्षा व स्विफ्ट कार अपघातात वृद्ध ठार.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- संगमनेर - कोपरगाव रस्त्यावर ॲपेरिक्षा व स्विफ्ट कारची धडक होत झालेल्या अपघातात वृद्ध व्यक्ती ठार झाली, तर एक महिला गंभीर जखमी झाली. मोगल तुकाराम गायकवाड (वय ८०) असे ठार झालेल्या वृद्धाचे नाव आहे. गुरुवारी सकाळी ९.१५ वाजण्याच्या सुमारास संगमनेर तालुक्यातील करुले शिवारात ही अपघाताची घटना घडली. 


Loading...
याबाबतची माहिती अशी : काशिनाथ पुंजा जगताप हे तळेगाव दिघे येथून संगमनेरच्या दिशेने ॲपेरिक्षातून (क्र. एमएच १७ एजे ३०२४) प्रवासी घेवून चालले होते. दरम्यान, पाठीमागून आलेच्या स्विफ्टकारची (क्र. एमएच १५ सीडी ४३०६) व ॲपेरिक्षाची जोराची धडक होत अपघात झाला. 

या अपघातात ॲपेरिक्षातून प्रवास करणाऱ्या मोगल गायकवाड (वय ८०, रा. करुले) या वृद्धाच्या पोटाला व छातीला जबर मार लागल्याने त्यांना संगमनेर येथील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले, तर गंभीर जखमी झालेल्या अलका चांगदेव दिघे यांना तळेगाव दिघे येथील खासगी दवाखान्यात उपचारार्थ दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान गायकवाड या वृद्धाचा मृत्यू झाला. 

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.