कोपरगावात विवाहितेचा आकस्‍मात मृत्‍यू.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- कोपरगाव शहरातील शंकरनगर भागात राहणारी पूजा कुंडलिक शिरसाठ (वय २७) ही गुरूवारी ५ जुलै रोजी सकाळी सहा वाजता घरात कोणालाही न सांगता घरातून निघून गेली. घरच्‍यांनी तिचा सर्वत्र शोध घेतला असता तिचे शव जवळच्‍या विहिरीत तरंगताना मिळून आले. 

याबाबत किशोर शिवराम अभंग (रा. धरणगाव रोड, कोपरगाव) यांनी कोपरगाव शहर पोलिसांत खबर दिली. सदर खबरीवरून पोलिसांनी रजिस्टर नंबर ३९/१८ सीआरपीसी १७४ प्रमाणे आकस्‍मात मृत्‍यूची नोंद केली असून पुढील तपास दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार काते करीत आहे. दरम्‍यान, ग्रामीण रूग्‍णालयात शवविच्‍छेदन होऊन अंत्‍यसंस्‍कार करण्यात आले.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.