विवाहितेचा विनयभंग व मारहाणप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- विवाहितेचा विनयभंग व मारहाण केल्याप्रकरणी विठ्ठल वामन बडे, इंदुबाई बडे व सचिन बडे या तिघांविरुद्ध पाथर्डी पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. . याबाबत सविस्तर माहिती अशी की, एका विवाहित महिलेचा विठ्ठल वामन बडे याने विनयभंग केला. त्या महिलेने हा प्रकार इतरांना सांगितला असता त्यांनी तिला शिवीगाळ करुन मारहाण केली. 


Loading...
जखमी महिलेवर पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. पोलिसांनी महिलेच्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. बुधवारी सकाळी महिलेचा पती व्यायाम करण्यासाठी गेला असताना हा प्रकार घडला. विठ्ठल बडे याने घरात घुसून सदर महिलेचा विनयभंग केला. तसेच इंदुबाई बडे व सचिन बडे या दोघांनीही त्या महिलेस शिवीगाळ करून मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.