उपजिल्हाधिकारी कावरे यांच्याकडे अहमदनगर मनपा उपायुक्तपदाचा अतिरिक्त पदभार.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- उपजिल्हाधिकारी श्रीमती-ज्योती कावरे यांच्याकडे अहमदनगर महानगरपालिका उपायुक्तपदाचा अतिरिक्त पदभार दिला आहे. उपजिल्हाधिकारी श्रीमती-ज्योती कावरे या सध्या जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा पुनर्वसन अधिकारी या पदावर कार्यरत असून, त्या एक अत्यंत कर्तव्यदक्ष व शिस्तप्रिय उपजिल्हाधिकारी म्हणून प्रसिद्ध आहेत. 


Loading...
तसेच त्या या पूर्वी पाथर्डी-शेवगावच्या उपविभागीय अधिकारी तथा प्रांतअधिकारी म्हणून कार्यरत होत्या. अहमदनगर महानगरपालिकेच्या कारभाराला शिस्त लावण्यासाठी आणि महापालिकेच्या आगामी डिसेंबर २०१८ महिन्यात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन अहमदनगर महापालिकेचे प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारीराहुल द्विवेदी यांचा हा एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.