ग्रामपंचायत सदस्यास सरपंच,उपसरपंचपती व सदस्यांकडून मारहाण.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- सोनई येथील ग्रामपंचायत सदस्य अनिल पंढरीनाथ बारहाते यांना सरपंच, उपसरपंच पती व इतर काही सदस्यांकडून शिवीगाळ, धक्काबुक्की व धमकी दिल्याप्रकरणी सोनई पोलिसांनी गुन्हा दाखल केला. बारहाते यांनी फिर्यादीत म्हटलेे, सोनई ग्रामपंचायतीमधील महिला सदस्यांऐवजी त्यांचा कारभार कुटुंबातील पुरुष मंडळी पाहतात. 

अनिल बारहाते हे एकमेव अपक्ष सदस्य आहेत. १ मार्च २०१६ रोजी झालेल्या ग्रामसभेत त्यांना या पुरुष मंडळींकडून शिवीगाळ करण्यात आली. त्यांनी जिल्हा परिषदेकडे तक्रार केली होती. ३० जूनला ग्रामपंचायतीची मासिक सभा चालू असताना बारहाते यांनी मोबाइलद्वारे चित्रीकरण केले. 

Loading...
महिला सदस्यांऐवजी पुरुष कागदपत्रांवर सह्या करताना त्यात चित्रित झाले. ही बाब उपसरपंचाचे पती संदीप कुसळकर यांच्या लक्षात आल्याने त्यांनी बारहाते यांना विचारणा केली. ग्रामपंचायतीचे सीसीटीव्ही कॅमेरे जाणूनबुजून बंद ठेवल्याने मोबाइलमध्ये शुटींग करून जि. प. अधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांना हे सादर करणार आहे, असे ते म्हणाले. सरपंच पती दादा वैरागर, संदीप कुसळकर, जालिंदर चांदघोडे, नितीन दरंदले, हरिभाऊ दरंदले यांनी त्यांना शिवीगाळ करून धक्काबुक्की करत मोबाइलची मागणी केली.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------


Powered by Blogger.