राहुरी एसटी बसस्थानकात चोऱ्या करणारी महिलांची टोळी पकडली


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- राहुरी शहर बसस्थानकावरील गर्दीचा फायदा घेऊन हात साफ करणाऱ्या मुंबईच्या झोपडपट्टीतील चार महिलांना बसस्थानकप्रमुखांनी रंगेहात पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. 

गुरूवारी सकाळी ११ वाजता ही घटना घडली. नगर येथील दोन महिला पाटोदे-पुणे एसटी बसमधून खाली उतरत असताना लहान मुले कडेवर असलेल्या ४ महिलांनी घेराव घालून एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण ओरबाडण्याचा प्रयत्न केला. Loading...
दुसऱ्या महिलेच्या पर्सवर हात साफ करून ४०० रूपयांची रोकड लंपास करण्यात आली. महिला प्रवाशांच्या वेळीच हा प्रकार लक्षात आल्याने सोन्याचे गंठण बचावले. मात्र, प्रवासासाठी ठेवलेली ४०० रूपये चोरीस गेले. 

संबंधित ४ महिलांना प्रवासी व बसस्थानक प्रमुखांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी चौकशी सुरू करताच ताब्यात घेतलेल्या महिलांनी जोराने रडारड सुरू केली. 

या घटनेची फिर्याद देण्यास कुणीही पुढे न आल्याने अखेर हेड काॅन्स्टटेबल अशोक गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लक्ष्मी कुमार व मंजु प्रशांत (अमरनाथ झोपडपट्टी, मुंबई, हल्ली नगर रेल्वेस्टेशन) यांच्याविरूध्द प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. राहुरीचे बसस्थानक भुरट्या चोऱ्यांमुळे बदनाम झाले आहे. 


अनेक वर्षांपासून बसस्थानकावर चोरांचा सुळसुळाट असून एकाही चोरीचा तपास पोलिसांना लावता आलेला नाही. चोऱ्यांना आळा घालण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. 


मात्र, चोऱ्यांचे सत्र थांबलेले नाही. आठवडे बाजारात खरेदीसाठी होणाऱ्या गर्दीचा फायदा घेऊन पर्स, सोन्याचे दागिने, मोबाइल हातोहात लांबवण्याच्या घटना सुरू आहेत.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.