अजित पवारांच्या अंबालिका साखर कारखान्याने 11 कोटी रुपये थकविले !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- कर्जत तालुक्यातील अंबालिका साखर कारखान्याने ऊस वाहतूकादारांचे वाहतुकीचे मागील वर्षाचे थकवलेले 11 कोटी रुपये मिळण्यासाठी उद्या दि.७ जुलै रोजी सर्व वाहतूकदार कारखान्याच्या कार्यस्थाळावर आमरण उपोषण करणार आहेत. जोपर्यंत मागील पैसे मिळत नाहीत, तोपर्यंत नवीन वाहतूक करार करणार नाही, अशी भूमिका सर्व वाहतूकादारांनी आज अंबालिका कारखान्याचा व्यवस्थापन मंडळाबरोबर झालेल्या बैठकीमध्ये घेतली आहे. 

यामुळे यंदाचा गळीत हंगाम कारखान्यासाठी अडचणीत आला आहे. आजच्या बैठकीस ऊस वाहतूकदार संघटनेचे अध्यक्ष दादासाहेब सुरवसे, विक्रमसिंह राजेभोसले, वसंत भोयटे, राजेंद्र लोंढे, उत्तम गरड, युवराज मोरे, सुनील गोडसे, श्रीराम गोडसे, देवीदास खानवटे, सागर तोरडमल, संपत जाधव, गणेश तोरडमल, विठठल खंडागळे, अंकुश भोसले, सदाशिव गोडसे , रमेश अळवी, लक्ष्मण खानवटे, निरंजन काळे, मच्छिंद्र गव्हाणे यांच्यासह सुमारे ५०० वाहतूकदार व जंगल वाघ तसेच कारखान्याचे व्यवस्थापक श्री. शिंदे उपस्थित होते. 


Loading...

यासदंर्भात दिलेल्या निवदेनात म्हटले आहे की, अंबालिका साखर कारखास सोलापूर, पुणे, बीड यासह इतरही जिल्ह्यांमधून ऊस वाहतूक व टोळयांची वाहतूक ट्रक व ट्रॅक्टरच्या साहय्याने करण्यात येते. मागलवर्षी ३५ टक्के वाहतूक भाडे दिले होते. त्यावेळी टोळया आणल्यास भाडे वाढ देऊ,असे सांगितले होते. प्रत्यक्षात या वर्षी अवघे २० टक्केच भाडे दिले आहे. 

ही आमची कारखान्याच्या व्यवस्थापन मंडळाने फसवणूक केली आहे. 11 कोटी रुपये मागील वर्षीच्या दराने राहिले आहेत. तसेच वाढीव रक्कम देणार होते, ती वेगळीच आहे. अंबालिका कारखान्यास वीजनिर्मिती, इथेनॉल,अल्कोहल, बगॅज आणि इतर उत्पन्नाचे स्त्रोत आहेत. असे असतानाही वाहतूकदारांचे पैसे थकवणे हे योग्य नाही. 

थकलेले वाहतूक भाडे मागणीसाठी कारखान्याच्या व्यवस्थापकांना वाहतूकदारानी २५ जून रोजी निवदेन दिले होते. त्यावेळी त्यांनी याबाबत ७ दिवसांची मुदत मागितली होती, ही मुदतही संपली आहे, त्यामुळे एक हज़ार ऊस वाहतूक कंत्राटदार दि.७ जुलै रोजी सकाळी 11 वा. कारखान्याच्या मुख्य शेतकी कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार आहेत. याबाबचे निवदेन आज जंगल वाघ यांना वाहतुकदारांनी दिले आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.