जे खासदार आपला प्रश्न मांडणार नाहीत त्‍यांच्‍या विरोधात मतदान करण्याचा ठराव


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- येत्‍या लोकसभा अधिवेशनात जे खासदार आपला प्रश्न मांडणार नाहीत त्‍यांच्‍या विरोधी मतदान करण्याचा ठराव पास करून अल्‍प पेन्‍शनधारकांच्‍या राष्ट्रीय संघर्ष समिती व महाराष्ट्र राज्‍य पेन्‍शनर संघटनेच्‍या वतीने नाशिकच्‍या पी.एफ. विभागीय कार्यालयाच्‍या टाळे ठोक आंदोलनाच्‍या वेळी विद्यमान खासदारांना हा इशारा देण्यात आला.

२९ जून रोजी सकाळी नाशिक येथील भविष्यनिर्वाह निधी विभागीय कार्यालयास टाळे ठोकण्यासाठी नगर-नाशिक, धुळे, जळगाव व नंदुरबार या पाच जिल्ह्यातील शेकडो 'ईपीएस ९५' पेन्‍शनधारक जमा झाले होते. ११ वाजता टाळे ठोकण्यास जात असतांना आयुक्‍त अशरफ यांनी शिष्टमंडळास चर्चेसाठी बोलावले. 

Loading...

नारायण होन, एस. के. समिंदर, एस. के. खैरे, प्रशांत संत (नाशिक), सुकदेव आहेर यांच्‍या शिष्टमंडळाने सविस्‍तर चर्चा करून कमीतकमी ७ हजार ५०० व त्‍यावर निगडीत महागाई भत्ता इतकी दरमहा पेन्‍शन मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी व ३१ मे २०१७ चे परिपत्रक रद्द करणे, मोफत आरोग्‍य सेवा, दोन वर्षे वेटेज आरओसी, कम्‍युटेशन इत्‍यादी मागण्यांचे निवेदन दिले.

संघटनेचे कार्याध्यक्ष सुभाष पोखरकर यांच्‍या नेतृत्‍वाखाली गेटजवळ धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी त्‍यांनी उपस्थितांना गेल्‍या ४ ते ५ वर्षात संघटनेने गल्‍ली ते दिल्‍ली केलेल्‍या पाठपुरावा व आंदोलनाचा आढावा घेतला. देविसिंग अण्णा जाधव, नारायण होन, अविना क्षीरसागर, सुकदेव आंधळे, एम. आर. सूर्यवंशी, भाऊसाहेब सोनवणे, कुडलिक सोनवणे, अशोक देशमुख, डी. एल. भोईटे यांनी आंदोलकांसमोर मनोगते व्‍यक्‍त केली. शेवटी नारायण होन यांनी आभार मानले.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.