स्वस्तात घराचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकला अटक.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  केडगाव व स्टेशन रोड परिसरात सामान्य लोकांना स्वस्तात घर देण्याचे आमिष दाखवून लोकांचा विश्वास संपादन करुन फ्लॅटसाठीच्या बुकींगच्या रकमा गोळा करुन पोबारा केलेला बांधकाम व्यावसायिकास पनवेल (जि. रायगड) येथून ताब्यात घेण्याची कारवाई कोतवाली पोलिसांनी केली आहे.  

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पंडीत गंगाराम घोरपडे (वय ६९, आनंदनगर, मल्हार चौक, नगर) यांनी न्यायालयात दाखल केलेल्या फिर्यादीवरुन कोतवाली पोलिस ठाण्यात १६ ऑगस्ट २०१७ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. 
Loading...

या गुन्ह्यामध्ये घनश्याम मारुती रोहोकले याने त्याच्या जीएमआर कन्स्ट्रक्शन, प्रमोटर्स ॲण्ड बिल्डर्स या फर्मद्वारे केडगाव व रेल्वे स्टेशन परिसरात कमीत कमी किंमतीत सामान्य लोकांसाठी बांधकाम सुरु करणार असल्याची जाहिरात वृत्तपत्रात दिली. 

त्या आधारे लोकांचा विश्वास संपादन करुन मोठ्या प्रमाणात आगाऊ रक्कम घेऊन त्यांना इसार पावत्या दिल्या.आरोपीने बांधकाम सुरु करुन ग्राहकांनी नोंदणी केलेल्या फ्लॅटच्या आगाऊ रकमा घेऊन पोबारा केला होता. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.