एस.टी.बसमध्ये तरूणीचा विनयभंग.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  अकोले ते संगमनेर या दरम्यान एस.टी. बसमधून प्रवास करत असतांना एका जणाने तरूणीचा विनयभंग केल्याची घटना बुधवारी (दि. ४) सकाळी साडेअकरा ते साडेबारा या दरम्यान घडली आहे. 

Loading...
याबाबत शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, ही २२ वर्षीय तरुणी अकोले तालुक्यातील राहणार आहे. ती बुधवारी सकाळी साडेअकरा ते साडेबारा या दरम्यान अकोले येथून संगमनेरकडे येणाऱ्या एस.टी. बसमधून प्रवास करत होती. 

त्याच दरम्यान बसमध्ये असणारा अशोक राधाकिसन दौड (रा.टाकळी, ता.अकोले) याने या तरूणीकडे पाहून अश्लील हावभाव करत तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. त्यामुळे या तरुणीने शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अशोक राधाकिसन दौड याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.