झारखंडमध्ये शिरच्छेद करून शिक्षिकेची हत्या; हातात शीर घेऊन आरोपी धावला गावभर !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  झारखंडमधील सरायकेला जिल्ह्यात खापरसाई गावात मंगळवारी एक अजब घटना घडली. शाळेच्या समोरच राहणाऱ्या एका माथेफिरूने सरकारी शाळेतील क्रीडाशिक्षक महिलेची गळा चिरून हत्या केली. यावरच न थांबता कापलेले शीर घेऊन तो संपूर्ण गावातील गल्ल्यांमधून धावत सुटला. 

त्याच्या हातात हत्यार असल्याने त्याला कुणीही अडवण्यास धजत नव्हते, तर उलट घाबरून पळत होते. या घटनेनंतर जवळपास चार तासांनी पोलिसांनी त्याला अटक केलेली आहे. खापरसाई गावातील सरकारी शाळेत सुकरू हेसा नामक या शिक्षिका शारीरिक शिक्षणाचा तास शिकवत असताना हरी हेब्राम हा वीसवर्षीय आरोपी शाळेसमोर आला आणि त्याने शिक्षिकेला शाळेसमोर बोलावले. 


शिक्षिका शाळेतून बाहेर पडताच त्याने सदरच्या महिला शिक्षिकेला जोराने ढकलत खाली पाडले. शिक्षिका खाली पडताच तिच्यावर तलवारीने वार करत तिची मान कापून टाकली. घटनास्थळीच शिक्षिकेचा मृत्यू झाला. आरोपी केवळ शिक्षिकेचा शिरच्छेद करून थांबला नाही तर त्याने आरडाओरड करत शिक्षिकेचे कटलेले शिर आणि तलवार हातात उचलून घेत गावातील गल्लीबोळातून धावत सुटला. Loading...
या घटनेची माहीती मिळताच पोलीस गावात पोहोचले. पोलिसांनी पाठलाग सुरू केला पण त्यांच्या हाताला लागत नव्हता जवळपास चार तासानंतर त्याला अटक करण्यात त्यांना यश मिळाले आहे. सुकरू हेसा नामक ३८ वर्षीय शिक्षिका या शाळेत नोकरी करत आहेत. 

तिचे घर लांबच्या गावी असल्याने ती शाळेसमोर असलेल्या हरि हेब्रामच्या घरी २००० रुपये प्रतिमहिना भाड्याने रहात होती. मागील चार महिन्यांपूर्वी ती खोली बदलून शालेय कमिटीच्या अध्यक्षाच्या घरी राहायला गेली. याचा राग त्याच्या मनात होता. यापूर्वीदेखील त्याने शिक्षिकेसोबत भांडणे केलेली होती, अशीही माहिती मिळाली आहे.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.