नोकरीसाठी अडीच लाखांची मागणी,राहुरीत विवाहितेचा छळ.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- राहुरी शहरातील २३ वर्षीय विवाहीत तरुणीचा तिच्या पतीला नोकरी लावण्यासाठी माहेरहून अडीच लाख रुपये आणण्यासाठी सलग दोन वर्षे शारिरीक व मानसिक छळ केल्या प्रकरणी विवाहीत तरुणीने राहुरी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून सासरच्या पाच लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी : म्हैसगाव (ता. राहुरी) माहेर असलेली विवाहिता देवयानी हिचा विवाह राहुरी शहरातील कासार गल्ली येथील ओमकार राजेंद्र जोशी या तरूणाशी दि. २३ एप्रिल २०‍१४ रोजी झाला होता. 

Loading...
सुमारे दोन वर्षे चांगले नांदविल्यानंतर देवयानी हिचा पती ओमकार जोशी याला नोकरी लावण्यासाठी माहेरहून अडीच लाख रुपये आणावे, या मागणीसाठी तिचा सासरच्या लोकांनी शारिरीक व मानसिक छळ सुरु केला.यादरम्यान तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ करत उपाशीपोटी ठेवण्यात आले. 

२३ एप्रिल २०१८ रोजी सासरच्या लोकांनी तिच्या अंगावरील दागिने काढून घेत तिला माहेरहून अडीच लाख रूपये घेऊन ये असे म्हणत घराबाहेर काढून दिले. असे फिर्यादीत म्हटले आहे.यादरम्यान देवयानीच्या माहेरच्या लोकांनी वेळोवेळी प्रयत्न करून तिला नांदावयास घेऊन जाण्याकरीता तिच्या सासरच्या लोकांना विनवणी केली. मात्र, याचा काही फायदा झाला नाही. 

अखेर देवयानी हिने राहुरी पोलीस ठाणे गाठून सासरे राजेंद्र बाळकृष्ण जोशी, सासू राजश्री, दीर प्रशांत, जाव नम्रता व पती ओमकार (सर्व रा. कासार गल्ली, राहुरी) यांच्याविरुद्ध फिर्याद दिली यावरून पाचजणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.