वर्षभरात साई संस्थानच्या तिजोरीत ३५० कोटींचे दान,१४० कोटींनी वाढले उत्पन्न


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- साईबाबा संस्थानच्या दानात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. गेल्या आर्थिक वर्षात साई संस्थानला साईभक्तांनी तब्बल ३५० कोटी रुपयांचे भरभरून दान केले आहे. मागील वर्षीचा आकडा हा २१० कोटी होता. त्यामुळे गेल्या आर्थिक वर्षात भक्तांनी साईंच्या तिजोरीत १४० कोटींहून अधिकची भर टाकली आहे. 

देशात सर्वाधिक श्रीमंत म्हणून तिरुपतीची गणना केली जाते, तर महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत म्हणून शिर्डीच्या साईबाबा संस्थानची गेल्या काही वर्षांपासून गणना केली जाते. शिर्डीला गेल्या काही वर्षांतील दानाच्या आकड्यात झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या वर्षी नोटबंदी केल्यानंतरही दानाच्या आकड्यात कोणतीही कमी झाली नव्हती.


Loading...
साई संस्थानला वस्तूंपासून ते सोन्यापर्यंत साईभक्त दान चढवतात. गेल्या आर्थिक वर्षात साई संस्थानला साईभक्तांनी तब्बल ३५० कोटी रुपयांचे दान दिले आहे. त्याच्या मागच्या वर्षीचा आकडा हा २१० कोटी होता. त्यामुळे गेल्या आर्थिक वर्षात भक्तांनी साईंच्या तिजोरीत १४० कोटींहून अधिकची भर टाकली आहे. साई संस्थानच्या गंगाजळीचा आकडा आता दोन हजार कोटींच्या वर जाऊन पोहोचला आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.