पाथर्डी भूमिअभिलेखच्या अधिकाऱ्याविरुध्द लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- पाथर्डीच्या उपअधिक्षक भुमीअभिलेख कार्यालयातील भुकरमापक शशिकांत सुग्रीव केंद्रे (वय २६) याला पिंपळगाव टप्पा येथील एका शेतकऱ्याला लाच मागीतल्याप्रकरणी अहमदनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी (दि.४) ताब्यात घेत त्याच्याविरुध्द पाथर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, तालुक्यातील पिंपळगाव टप्पा येथील एका शेतकऱ्याने पाथर्डीच्या उपअधिक्षक भुमीअभिलेख कार्यालयाकडुन जमीनीची मोजणी करुन घेतली होती. मोजणीप्रमाणे नकाशा तयार करुन देवुन प्रकरण निकाली काढण्यासाठी शेतकऱ्याकडे भुकरमापक शशिकांत केंद्रे याने २८ मे २०१८ रोजी दहा हजाराची लाच मागीतली. Loading...
तडजोडीअंती लाचेची रक्कम आठ हजार रुपये ठरली होती. अहमदनगर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी पोलिस निरीक्षक शाम पवरे व दिपक करांडे, तन्वीर शेख, प्रशांत जाधव, विजय गंगुल, काधा खेमनर यांनी बुधवारी दुपारी उपअधिक्षक भुमीअभिलेख कार्यालयात येवुन केंदे याला ताब्यात घेतले. 

तेथुन त्याला पोलिस ठाण्यात आणले व त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिस निरीक्षक दिपक करांडे यांनी फिर्याद दिली असुन शशिकांत केंद्रे याच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायदा १९८८ चे कलम ७,१५ प्रमाणे गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
-------------------------------
Powered by Blogger.