श्रीगोंद्यातील भाग्यश्री फंडने राष्ट्रीय कुस्ती मैदान गाजवत सुवर्णपदक पटकविले !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  दिल्लीचे राष्ट्रीय कुस्ती मैदान गाजवत श्रीगोंद्यातील भाग्यश्री फंड हिने सुवर्णपदक पटकविले आहे. मेरठ येथे पार पडलेल्या राष्ट्रीय सब ज्युनिअर महिला कुस्ती स्पर्धेत भाग्यश्री फंड हिने ५७ किलो वजन गटात उत्कृष्ट कामगिरी करत सुर्वण पदकाचा बहुमान आपल्या नावावर नोंदवित संपूर्ण राज़्यात श्रीगोंदा तालुक्याची मान उंचविण्याचे काम केले आहे. 

यानिमित्त कुकडी सह. साखर कारखान्याचे चेअरमन आ. राहुल जगताप पाटील यांनी दि. ३ जुलै रोजी भाग्यश्री फंड यांचा सत्कार केला. भाग्याश्री व धनश्री फंड दोघी भगिनी महिला कुस्तीपट्टू असून, या दोघी भगिनींना स्व. कुंडलिकराव (तात्या) रामराव जगताप पाटील प्रतिष्ठानतर्फे दरमहा प्रत्येकी ६००० रुपये मानधन दिले जाते. Loading...
भाग्यश्री फंड हिने गेल्या सहा महिन्यांत राष्ट्रीय स्तरावरील शालेय, खेलो इंडिया व सब ज्युनिअर कुस्ती स्पर्धेत तीन सुवर्णपदके जिंकून हॅटट्रिक साधली आहे. मेरठमध्ये झालेल्या स्पर्धेत ५७ किलो वजन गटात भाग्यश्रीला पहिल्या फेरीत बाय मिळाला.

दुसऱ्या फेरीत भाग्यश्रीने दिल्लीच्या नेहाचा पराभव करून तिसऱ्या फेरीत प्रवेश केला, या फेरीत कर्नाटकच्या सुजाता पाटीलला अस्मान दाखवत अंतिम सामन्यात मणीपूरच्या बिस्वरीयावर १० विरुद्ध ० गुणांनी मात करून सुवर्ण पदकावर नाव कोरले.


या सुर्वण कामगिरीबद्दल आ. राहुलदादा जगताप पाटील यांनी तिचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या वेळी उपस्थितीत महिला कुस्तीपट्टू धनश्री फंड, साधना रोडे (टाकळी लोणार) व पंढरपुर येथील निकिता मोरे यांचाही आ. जगताप पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 


यापुढे कोणतीही मदत हवी असल्यास सदैवं तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहण्याचे आश्वासन आ. ज़गताप यांनी दिले. या वेळी ओम गुरुदेव महिला संस्थेच्या चेअरमन, श्रीमती अनुराधाताई कुंडलिकराव जगताप पा, डॉ. प्रणीती (माई) राहुलदादा जगताप पा.,अजोबा नामदेव फंड, शिवराज रोडे, हनुमंत रोडे, टाकळेश्वर सोसायटीचे चेअरमन विजयकुमार कानगुडे, आई पूजा फंड व आत्या आदी उपस्थित होते.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
-------------------------------
Powered by Blogger.