शेवगावात वाळूचा ढिगारा अंगावर कोसळून एकाचा मृत्यू.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  गावच्या नंदिनी नदीपात्रात दहा फूट खोल असलेल्या वाळूच्या खड्डयातून वाळू भरत असताना वाळूचा ढिगारा अंगावर कोसळून एकाला प्राणास मुकामे लागले तर दुसरा जबर जखमी झाला. ही घटना सोमवार,दि. ३ रोजी सकाळी ९.३० वा. शेवगाव तालुक्यातील पिंगेवाडी येथे घडली. 

शेवगाव पोलिसांनी सिध्दिक शामक शेख रा. पिंगेवाडी, ता. शेवगाव याच्याविरोधात सदोष मनुष्यवध, वाळू चोरी करणे व पर्यावरणाचे नुकसान केल्यासंदर्भात गुन्हा दाखल केला आहे. नितीन अंकुश निकाळजे (वय-२५) असे मयताचे नाव आहे. यासंदर्भात जखमी नितीन स्वार्थिक अंगरख रा. पिंगेवाडी, ता. शेवगाव याने सिध्दीक शेख यांच्याविरोधात शेवगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. 

Loading...
त्यात म्हटले आहे की, पिंगेवाडी येथील सिध्दीक शेख हे नदीपात्रातून विनानंबर ट्रॅक्टरच्या सहाय्याने वाळू उपसा करतात. ते काल ट्रॅक्टरमध्ये वाळू भरण्यासाठी मयत नितीन अंकुश निकाळजे (वय-२५), जखमी नितीन अंगरखे व दोघे रा. पिंगेवाडी हे सिध्दीकी यांच्या आग्रहावरून नदीपात्रात वाळू भरण्यासाठी गेले होते. 

दहा फूट खोलीचा धोकादायक खड्डा असल्याचे माहीत असतानाही सिध्दीक याने त्यांना जबरदस्तीने खड्डयात उतरविले. वाळू भरत असताना वाळूचा ढिगारा अचानक त्यांच्या अंगावर कोसळला. त्यामध्ये नितीन अंगरख व नितीन निकाळजे दबले गेले. त्यांना त्या ढिगाखालून उकरून काढले. मात्र ते जबर जखमी झाल्याने त्यांना ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून नगरला पाठवले होते. 

मात्र, नितीन निकाळजे हे मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अंगरख याच्यावर नगर येथे उपचार चालू आहेत. आज बुधवार,दि.४ रोजी निकाळजे याचा मृतदेह शेवगाव पोलीस ठाण्यात आणण्यात आला. नातेवाईकांनी आरोपीला त्वरित अटक करेपर्यंत आम्ही मृतदेह हलिवणार नाही, अशी भूमिका घेतली. सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मगर यांनी आरोपीला त्वरित अटक करण्याचे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.