विरोधी पक्षनेत्यांच्या मतदारसंघात टारगटांकडून घरांवर दगडफेक; रहिवासी धास्तावले.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  राहाता शहरात काही टारगट मुलांकडून रात्री घरांवर दगडफेक केली गेल्यामुळे वीस कुटुंबे रात्र दहशतीखाली जागून काढत आहेत. याबाबत पोलिसांकडे तक्रार करूनही दखल न घेतल्यामुळे आम्हाला रात्र दहशतीखाली काढावी लागल्याची तक्रार महिलांनी केली. 

चांभारगल्लीत रात्रीच्या वेळी घरांवर दगडफेक करण्याचा प्रकार गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू आहे. शहरातील काही टारगटांकडून हे प्रकार होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. मध्यरात्री बारा ते दोनच्या दरम्यान एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर या परिसरातील वीस ते पंचवीस घरांवर अचानक दगडफेक केली जाते. 
Loading...

घरातील कर्ती माणसे दगडफेक करणाऱ्यांचा शोध घेण्याच्या आत ते पसार होतात. मध्यवस्तीत हा प्रकार घडत असल्याने या कुटुंबातील अनेकांनी घर सोडण्याचा मनोदय व्यक्त. पुरुष मंडळींनी या धास्तीने कामावर जाणे बंद केले आहे. याबाबत पोलिसांत तक्रार देऊनही दगडफेक बंद झालेली नाही, उलट त्यात वाढच झाली, असे नागरिकांनी सांगितले. 

पोलिस म्हणतात, दगडफेक करणाऱ्यांची नावे सांगा, आम्ही बंदोबस्त करतो. हा प्रकार काही टारगटांकडून होत असून त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. सध्या गुन्हेगारी व अंधश्रद्धा वाढत असून सोशल मीडियामुळे त्याला आणखी खतपाणी मिळते आहे. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.