मराठा समाज एकवटला पीडित 'आशा'साठी आज पोलिस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- आशा सेविकेकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्या सरपंचाच्या पतीची चौकशी करुन कारवाई करण्यात यावी, तसेच खोटा गुन्हा मागे घेण्यात यावा यासाठी शिवप्रहार संघटना, सकल मराठा समाज व ग्रामस्थांच्या वतीने गुरुवारी जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा नेण्यात येणार आहे. 
Loading...

नगर तालुक्यातील सोनेवाडी येथील सरपंचाच्या पतीने दारुच्या नशेत गावातील आशासेविकेकडे शरीरसुखाची मागणी केली. याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने आणि प्रकरण अंगलट आल्याने संबंधिताने पत्नीच्या माध्यमातून पीडित महिलेसह नऊजणांविरोधात अॅट्रॉसिटीची तक्रार दिली. 

दोन्ही गटांकडून परस्परविरोधी फिर्यादी दाखल करण्यात आल्या आहेत. शिवप्रहारचे संस्थापक अध्यक्ष संजीव भोर यांनी सोनेवाडीत जाऊन संबंधित महिलेची विचारपूस करत आधार दिला. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.