पोलिसांचे वाहन भासवून देशी दारूची वाहतूक !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- महाराष्ट्र पोलिसांचा लोगो मारूती ओमनी (व्हॅन) गाडीला लावून देशी दारु वाहतूक करणाऱ्याला गाडीसह 3 लाख 24 हजार 690 रुपये मुद्देमालासह रात्री 11.30 वाजता अकोले पोलिसांनी पकडुन गुन्हा दाखल केला आहे. 

याबाबत पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, संगमनेर येथून कोतुळला संजीवनी बॉबी देशी दारु विक्रीसाठी मारुती ओमनी (व्हॅन) एमएच 14 एक्‍स 3222 या गाडीतून दत्तू श्रावणा रेंगडे रा.धामणवन हल्ली मु माळीझाप हा घेऊन जात असताना गुप्त माहितीवरून अकोले पोलिसांनी शहरातील खटपट नाका या ठिकाणी गाडी पकडली. 

Loading...

यावेळी संजीवनी बॉबी देशी दारूच्या बाटल्या भरलेले दहा बॉक्‍स ज्याची किंमत 24 हजार 690 रुपये व मारूती ओमनी गाडी असा एकुण तीन लाख 24 हजार 690 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.