संगमनेरमध्ये 15 वर्षीय तरुणीला लग्नाचे आमीष दाखवून अत्याचार.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- संगमनेर तालुक्‍यातील बोटा येथील 15 वर्षीय तरुणीला लग्नाचे आमीष दाखवून अत्याचार केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला.अक्षय सोमनाथ राजगुरू (वय 21, मूळचा राहणार टिळकनगर, ता. श्रीरामपूर, हल्ली राहणार अकलापूर, संगमनेर ) याला घारगाव पोलिसांनी अटक केली. 

बोटा येथील 15 वर्षांच्या तरुणीला अक्षय याने लग्नाचे आमीष दाखवले. 21 जून रोजी या मुलीचे अपहरण केल्याची फिर्याद घारगाव पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. पोलीस उपनिरीक्षक अन्सार इनामदार व त्यांच्या पथकाने, फिर्यादी व नातेवाईक यांच्या मदतीने पीडितेचा राहुरी व श्रीरामपूर येथे शोध घेतला. 
Loading...

यावेळी ती आरोपीसह मिळून आली. पीडितेच्या केलेल्या चौकशीत अक्षय याने लग्नाचे आमीष दाखवून बोटा येथून पळवून नेले. राहुरी व श्रीरामपूर येथील नातेवाईकांकडे ठेवले. दरम्यान त्याने अत्याचार केल्याची फिर्याद देण्यात आली. पोलिसांनी तरुणाला अटक केली. त्याला संगमनेरच्या न्यायालयापुढे हजर केले असता मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.