पाथर्डीत एकाच रात्री पाच ठिकाणी चोरीचा प्रयत्न.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- शहरातील भगवाननगर व फुलेनगर या उपनगरात एकाच रात्री पाच ते सहा जणांच्या घरी रविवारी रात्री चोरीचा प्रयत्न झाला. विनायक बडे यांच्या घरातून अठरा हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे, मनसेचे किरण पालवे व स्थानिक नागरिकांनी सोमवारी पोलिस निरीक्षकांची भेट घेत चोऱ्यांचा तपास लावण्याची मागणी केली. 

शहरातील भगवाननगर व फुलेनगर या उपनगरांतील नागरिकांना गेल्या तीन महिन्यांपासून चोरट्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. येथील उद्यानामधे लहान मुले, मुली व महिला फिरण्यासाठी येतात, तेथे काही टारपगट मुले मोटारसायकलवर येऊन हॉर्न वाजविणे, महिलांना शेरेबाज़ी करणे, असे प्रकार करतात. 
Loading...

रविवारी रात्री विनायक बडे यांच्यासह पाच जणांच्या घरात चोरीचा प्रयत्न झाला. काही ठिकाणी नागरिक जागे झाल्याने चोरीचा प्रयत्न फसला. सोमवारी सायंकाळी नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे, मनसेचे किरण पालवे, विनायक बडे, संजय कराड, श्रीकृष्ण खेडकर, वैंश्यपायन गर्जे, अविनाश फुंदे, भागीनाथ बडे, ओमप्रकाश दहिफळे, शिवाजी मरकड, सुरेश मिसाळ, माणिक पालवे, हरिभाऊ फुंदे यांच्यासह ग्रामस्थांनी पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांची भेट घेतली. 

चोरीचा तपास लागला पाहिज, महिलांची व मुलींची छेडछाड बंद झाली पाहिजे, अशी मागणी केली. या वेळी पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर म्हणाले, चोरीच्या घटनांबाबत गुन्हा दाखल केला आहे. चोरट्यांचा तपास तातडीने लावू, नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, उपनगरात पोलिसांची गस्त वाढवू, असे आश्वासन दिले.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.