नेवाशाचे प्रतिनिधित्व भविष्यात विठ्ठलराव लंघेच करणार!


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  स्व. वकिलराव लंघे यांच्या विचारांचा वारसा त्यांच्या पाऊलावर पाऊल ठेऊन विठ्ठलराव लंघे उत्तम प्रकारे चालवत आहेत. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विकासाची गंगा नेवासा तालुक्‍यात त्यांनी आणली. जिल्हा परिषदेमध्ये सर्व सदस्यांना विश्‍वासात घेऊन काम केल्याने त्यांचे नाव जिल्ह्यात पोहोचले. भविष्यकाळ हा त्यांचाच असून तेच नेवासा तालुक्‍याचे प्रतिनिधित्व करणार आहेत. तशी संधी भगवंताने त्यांना द्यावी, असे गौरवोद्‌गार माजी आमदार पांडुरंग अभंग यांनी काढले. 

Loading...
जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा अभीष्टचिंतन सोहळा शिरसगाव (ता.नेवासे) येथील वकिलराव लंघे विद्यालयात पार पडला. वाढदिवसानिमित्त विठ्ठलराव लंघे मित्रमंडळाच्या वतीने रक्‍तदान शिबीर, वृक्षारोपन, स्व. सखाराम बाळा पाटील आगळे सेवाभावी संस्थेच्या वतीने तालुकास्तरीय निबंध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. 

जनतेच्या आशीर्वादानेच संकटातही मिळते बळ विठ्ठलराव लंघे म्हणाले, यावर्षी इतर कार्यक्रमास फाटा देऊन विद्यार्थ्यांना प्रेरणा म्हणून भुमिपुत्रांचा व गुणवंतांचा सत्कार व मयत राजेंद्र गवळी कुटुंबास मदत देऊन वाढदिवस साजरा करण्याचे ठरविले. 

स्व. वकिलराव (अण्णा) लंघे यांचे संस्कार व शिकवण सोबत घेऊन प्रामाणिकपणे व सचोटीने काम करत आहे. सर्वसामान्य जनतेच्या आशीर्वादाने आपण निवडणूक लढलो. कधी पराभव झाला तरी खचलो नाही, अनेक संकट आले पण कधी डगमगलो नाही, जोपर्यंत गोरगरिबांचा आशीर्वाद सोबत आहे तोपर्यंत माघार घेणार नाही. मला साथ देण्याऱ्यांचा कायम ऋणी राहिल, असे त्यांनी आधोरेखित केले.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.