उपसरपंचांच्या सतर्कमुळे एकाचे प्राण वाचले,जामखेड तालुक्यात धुळ्याची पुनर्रावृत्ती टळली.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  धुळे जिल्ह्यातील राईनपाडा येथे नाथपंथिय समाजातील पाच जनांची येथील लोकांनी लहान मुलांना पळवणारे समजून त्यांना अमानुष्य मारहाण केली ज्यात त्या सर्वांचा मृत्यू झाला. दरम्यान दि.१ जुलै रोजी जामखेड तालुक्यातील पाटोदा,(गरडाचे) येथे रात्री १० वाजण्याच्या सुमारास बस स्टँड जवळ एक अज्ञात व्यक्ती आला. त्यावेळी गावातील नागरिक जमा झाले व त्यास मारहाण करणार होते.


Loading...
याचवेळी पाटोदा गावचे उपसरपंच गफ्फार पठाण हे आले व त्यास मारहाण न करण्याचे ग्रामस्थांना आवाहन केले. तसेच या घटनेबाबत तात्काळ जामखेड पोलीस स्टेशनला कळविले. पोलीस पथकाने तात्काळ संबंधित ठिकाणी जावून त्या अनोळखी व्यक्तीस ताब्यात घेतले. 

त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता, तो व्यक्ती चोंडी,ता. जामखेड येथील रहिवासी असल्याचे सांगितले. त्याची चोकशी करून त्याला नातेवाईकांच्या ताब्यात दिले. याकामी वेळीच दखल घेवून एका निरपराध्यास मारहाण करण्यापासून ग्रामस्थांना रोखले. त्यामुळे उपसरपंच गफ्फार पठाण व इतर युवकांचा सत्कार केला. 


याप्रसंगी सर्व ग्रामस्थांना पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांनी आवाहन केले. की, कोणी अनोळखी व्यक्ती आपल्या गावात आढळून आल्यास त्याला मारहाण न करता. नजीकच्या पोलिसांशी संपर्क साधावा. कोणत्याही प्रकारे कायदा हातात घेऊ नये, तसेच सोशल मिडियावरील अफवांवर विश्वास ठेऊ नये.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.