शतकातील सर्वात मोठे चंद्रग्रहण २७ जुलै रोजी, भारतातूनही दिसणार ब्लड मून !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :२१ व्या शतकातील सर्वात मोठ्या चंद्रग्रहणाचे विहंगम दृश्य भारतीय खगोलप्रेमींना पाहता येणार आहे. २७-२८ जुलैच्या मध्यरात्री हे चंद्रग्रहण लागेल. १ तास ४३ मिनिटे चालणारे हे पूर्ण चंद्रग्रहण जगभरासह भारतातील खगोल अभ्यासकांसाठी एक पर्वणी मानले जात आहे. 
Loading...

ग्रहणाच्या वेळी चंद्र लालसर रंगात दिसणार असल्याने त्याला 'ब्लड मून' अर्थात रक्त चंद्र असे म्हणतात. देशाच्या विविध भागातून उघड्या डोळ्यांनी हे ग्रहण पाहता येईल.. बिर्ला इ्स्टिटट्यूटच्या तारांगणचे संचालक देबीप्रसाद दुआरी यांनी या ग्रहणाबाबत माहिती दिली. 


देशातील खगोलप्रेमी हे नशीबवान आहेत. कारण त्यांना अंशत: आणि पूर्ण असे दोन्ही चंद्रग्रहण पाहण्याची संधी मिळणार आहे. देशाच्या प्रत्येक भागातून हे दोन्ही ग्रहण पाहता येऊ शकतात, असे दुआरी म्हणाले. . दक्षिण अमेरिका, आफ्रिका, पश्चिम आशिया आणि मध्य आशियाच्या काही भागातून हे चंद्रग्रहण स्पष्टपणे दिसेल. 


पूर्ण चंद्रग्रहण हे १ तास ४३ मिनिटांचे तर आंशिक चंद्रग्रहण हे एका तासाचे असेल. भारतीय वेळेनुसार २७ जुलैच्या रात्री ११ वाजून ५४ मिनिटांना आंशिक चंद्रग्रहण सुरू होईल. तर पूर्ण चंद्रग्रहण रात्री १ वाजता सुरू होईल. एक वाजून ५२ मिनिटे ते २ वाजून ५३ मिनिटांपर्यंत चंद्र पूर्णपणे झाकोळलेला असल्याने काळाकुट्ट अंधार असेल. 


यानंतर पहाटे ३ वाजून ४९ मिनिटांपर्यंत पुन्हा आंशिक ग्रहण पाहता येईल. भारतीय खगोलप्रेमींसाठी ही सुवर्णसंधी आहे. कारण जवळपास पूर्ण रात्रभर खगोलप्रेमींना ग्रहणाचे हे अनोखे दृश्य उघड्या डोळ्यांनी पाहता येणार आहे. चंद्रग्रहण हे सूर्यग्रहणाप्रमाणे डोळ्यांना हानीकारक नसते. 


त्यामुळे त्याला उघड्या डोळ्यांनी पाहता येऊ शकते, असे दुआरी यांनी सांगितले. . पूर्ण चंद्रग्रहणादरम्यान चंद्र जेव्हा पृथ्वीच्या कक्षेत येतो तेव्हा त्याच्यावर लाल रंगाची सावली पडते. त्यामुळे तो लालसर दिसू लागतो. यालाच ब्लड मून असे म्हटले जाते. यापूर्वी पूर्ण चंद्रग्रहण ३१ जानेवारीला लागले होते. तर पुढील पूर्ण चंद्रग्रहण २१ जानेवारी २०१९ रोजी असेल.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.