सरपंच पतीकडून आशा सेविकेचा विनयभंग, ॲट्रोसिटीसह परस्परविरोधी फिर्यादी ११ जणांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नगर तालुक्यातील सोनेवाडी येथे एक महिला गावातील सरकारी हौदाजवळ पाणी भरत असताना महिलेशी गैरवर्तन करीत तिचा विनयभंग करत तिला जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात तिघा जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

दरम्यान, याच प्रकरणी अन्य एका महिलेस दमदाटी करीत जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी ८ जणांविरुध्द ॲट्रॉसिटीसह विनयभंगाचा परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अन्य एका महिलेस दमदाटी करीत जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी ८ जणांविरुध्द ॲट्रॉसिटीसह विनयभंगाचा परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Loading...
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पहिल्या घटनेत एक महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, रविवारी, दि. १ जुलै रोजी दुपारच्या सुमारास घरी एकटी असताना नवनाथ सारंगधर बेरड याने फोन करीत ग्रामपंचायतमध्ये बैठक सुरु असून तु का आली नाहीस? असे म्हणत विचारणा केली. 

त्यानंतर सदर महिला पाणी आणण्यासाठी गावातील सार्वजनिक हौदावर गेली असता सुरेश रामचंद्र चांदणे, नवनाथ बेरड व गुलाब सारंगधर बेरड यांनी सदर महिलेशी लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. महिलेने आरडाओरड केली असता हे तिघे जण तेथून पळून गेले. 

त्यानंतर सुरेश चांदणे व नवनाथ बेरड यांनी सदर महिलेस फोन करुन अश्लिल शब्द वापरले तसेच पुन्हा रात्री ८ वा. महिलेच्या घरी जावून जिवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी तिघां जणांविरुध्द महिलेस लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याप्रकरणी तसेच जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर दुसऱ्या घटनेत गावातील एका महिलेस जातीवाचक शिवीगाळ करुन जिवे ठार मारण्याच्या धमकी दिल्याप्रकरणी ८ जणांविरुध्द नगर तालुका पोलिस ठाण्यात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत दिलेल्या फिर्यादीत सदर महिलेने म्हटले आहे की, बाबासाहेब एकनाथ बेरड, सुभाष भगवान बेरड, निवृत्ती परशुराम बेरड, केशव भगवान बेरड, साहेबराव निवृत्ती बेरड, निवृत्ती पांडुरंग बेरड, तुकाराम अर्जुन बेरड, गोरख किसन बेरड व अन्य एक महिला यांनी अनाधिकाराने महिलेच्या घरात घुसून जातीवाचक शिवीगाळ, दमदाटी करत जिवे मारण्याची धमकी दिली. 

तर बाबासाहेब व सुभाष बेरड यांनी लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याने ८ जणांविरूध्द नगर तालुका पोलिस ठाण्यात जातीवाचक शिवीगाळ करत विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.