श्रीरामपूरमध्ये गरोदर महिलांचे व्हिडिओ काढणाऱ्या डॉक्टरला अटक.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात आलेल्या गरोदर महिलांचे आपत्तीजनक व्हीडीओ काढणाऱ्या डॉक्टरला पोलिसांनी अटक केली आहे. एका महिलेच्या निनावी पत्राने या प्रकरणाला वाचा फुटली.

याबाबत पोलिसांनी सांगितलेली माहिती अशी, एक अनोळखी महिला तीन ते चार महिन्यांपूर्वी साखर कामगार रुग्णालयात तपासणीसाठी गेली होती. त्यावेळी तेथे असलेल्या महिलांचे त्यांना लज्जा उत्पन्न होईल, अशा स्थितीत एका डॉक्टरने व्हीडीओ शुटींग केले व त्यांचा विनयभंग केला, असे फिर्यादीत म्हटले आहे..

Loading...

काही दिवसांपूर्वी पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्याकडे एका महिलेना निनावी पत्र पाठविले होते. त्यात म्हटले होते, की वॉर्ड क्रमांक ६ मधील सुभाष कॉलीनीत राहात असलेल्या या डॉक्टरने गरोदर महिलांची तपासणी करताना त्या महिलांच्या नकळत त्यांची आपत्तीजनक व्हीडीओ शुटींग केली आहे. 


जर आपण गुन्हा दाखल करून या डॉक्टरवर कारवाई केली, तर पीडित महिला नक्कीच तक्रार देण्यासाठी पुढे येतील. या पत्राचे गांभीर्य पाहून वाघचौरे यांनी शहर पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते. 

त्यानंतर पोलिसांनी पोलीस नाईक रवींद्र दादासाहेब कोरडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून डॉ. योजित संजीत बोरसे (२५, रा. शेळके हॉस्पिटलमागे, सुभाष कॉलनी) याला अटक केली असून त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.