संजू’ फिल्म मधील ‘घपा-घप’आणि विकी कौशल सगळीकडे ट्रेंडिंगमध्ये !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- संजू’ फिल्म मध्ये संजय दत्त च्या मित्राचा रोल करणाऱ्या कमलेश अर्थात विकी कौशलने या चित्रपटात केलेल्या अभिनयाच सध्या सर्वच थरातून कौतुक होताना दिसत आहे. मसान मध्ये ‘तू किसी रेल सी गुजरती है, मै किसी पूलसा थरथराता हु’ असं म्हणणाऱ्या विकी कौशलने पदार्पणातच आपण लंबी रेस का घोडा असल्याचं सिद्ध केलं होत.


‘संजू’ फिल्म परवा शुक्रवारी रिलीज झाल्यापासून फिल्म मधला ‘घपा-घप’ हा कमलेशचा डायलॉग चांगलाच ‘वर्ल्डफेमस’ झालाय… आणि त्यासोबतच फिल्ममध्ये कमलेशच्या भूमिकेत अप्रतिम अभिनय करणारा विकी कौशल… तो सुद्धा सगळीकडे ट्रेंड होतोय…त्याच्या तगड्या परफॉर्मन्सचं सगळीकडे कौतुक होत आहे

Loading...
संजू’ बघताना विकी कौशलने साकारलेला कमलेश खूप आवडून जातो… सुनील दत्त – नर्गिस यांचा फॅन ते संजय दत्तचा जिगरी दोस्त हा कमलेशचा प्रवास चांगलाच लक्षात राहतो

रमन राघव 2.0 आणि राझी मध्ये पण विकीने जबरदस्त अभिनय केला. आणि आता ‘संजू’ मध्ये त्याने आणखी एक तगडा परफॉर्मन्स दिलाय. 2016 गुगलने फादर्स डे निमित्त ‘द हिरो- अ बॉलिवूड स्टोरी’ हा 6 मिनिटांचा एक video केला होता. त्यात नंदू माधव यांनी वडिलांची आणि विकी कौशल याने मुलाची भूमिका केली होती. खूप ‘टची’ झाला होता

Loading...

विकीचे वडील श्याम कौशल हे बॉलीवूड मधील प्रसिद्ध ऍक्शन डायरेक्टर आहेत. क्रिश २-३, बजरंगी भाईजान, स्लमडॉग मिलेनियर अशा प्रसिद्ध फिल्म्स साठी त्यांनी ऍक्शन डायरेक्टर म्हणून काम केले आहे. तर विकीचा भाऊ सनी कौशल याने हा ‘गुंडे’ , मे फ्रेंड पिंटो या चित्रपटांसाठी सहायक दिग्दर्शक म्हणून काम केलं आहे.
‘संजू’ मुळे विकी कौशलने आपण लंबी रेस का घोडा असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध केलंय हे मात्र नक्की…

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.